देशात 24 तासात 60,739 नव्या रुग्णांची नोंद, 97779 रुग्णांची कोरोनावर मात 

0
29

देशात कोरोनाची प्रकरणे सातत्याने कमी होत आहेत. शुक्रवारी 60,739 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले. 97,779 रूग्ण बरे झाले, तर 1,645 लोकांनी आपला जीव गमावला. अशा प्रकारे, सक्रिय रुग्णांची संख्या म्हणजेच उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 38,709 ने कमी झाली. मागील 24 तासात देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 500 पेक्षा कमी नवीन प्रकरणे नोंदवली गेली. त्याच वेळी 14 राज्यात 1000 पेक्षा कमी संक्रमित रुग्ण आढळून आले.उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, बिहार, झारखंड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गोवा, पुडुचेरी, चंडीगड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, नागालँड, लडाख, सिक्किम, मिझोरम, दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव , लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार या राज्यांमध्ये 500 रुग्णांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले.