नक्षलवाद्यांच्या तावडीतून CRPF जवान राकेश्वर सिंह आझाद

0
22

नक्षलवाद्यांने सीआरपीएफ जवान राकेश्वर सिंह यांना सोडले आहे. 3 एप्रिल रोजी छत्तीसगडच्या बिजापुरात जवानांवर हल्ला झाला होता.यानंतर या हल्ल्यात नक्षलवाद्यांनी राकेश्वर सिंह यांचं अपहरण केल्या गेलं होतं. तसेच या हल्ल्यात 22 जवान सुद्धा वीरगतीला प्राप्त झाले होते तर अनेक जवान जखमी झाले होते.नक्षलवाद्यांकडून असे म्हटल्या जात होते की, ‘3 एप्रिलला 2 हजार भारतीय जवान हल्ला करण्यासाठी जीरागुडेम गावाजवळ पोहोचले होते. त्यांना रोखण्यासाठी हल्ला केला गेला होता. नक्षलवाद्यांनी एका जवानाचं अपहरण केल्याचं देखील सांगितलं होतं. तसेच सरकारने आधी मध्यस्थींच्या नावाची घोषणा करावी, त्यानंतर जवानाला सोडण्यात येईल. असे म्हटले होते. मात्र जवान राकेश्वर सिंह यांना सोडून दिल्याच्या बातमीनंतर त्यांच्या कुटुंबाने आनंद व्यक्त केला आहे. तसेच राकेश्वर सिंह यांच्या पत्नीने सरकारचे आभार मानले आहेत.त्यांना आता उपचारासाठी बसागुडा रुग्णालयात दाखल केले गेले आहे.