नवजात शिशूसह १२ वर्षापर्यंतच्या बालकांना लस देणे होणार शक्य !

0
19

वोशिंग्टन: कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे याचं पार्श्वभूमीवर अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. यामध्ये १६ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यात येत आहे. नवजात बालके, अल्पवयीनांना लसीकरणातून वगळण्यात येत आहे.मात्र सहा महिन्यांच्या नवजात शिशूसह ते १२ वर्षापर्यंतच्या बालकांना लस देणे शक्य होणार आहे. अमेरिकन बायोटेक कंपनी मॉडर्ना या वयोगटासाठी लस विकसित करत आहे.यावर अजून संशोधन सुरू असून लवकरच यावर यश मिळणार आणि ही लस मुलांसाठी बाजारात येणार असल्याची माहिती सुद्धा दिली.