नांदेड जिल्ह्यात २५ मार्चपासून ११ दिवसांचे लॉकडाऊन

0
33

नांदेड :जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्राधुर्भाव बघता कोरोना साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंधासह 25 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. व्यापक जनहितास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून 11 दिवसांसाठी संपूर्ण नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व अत्यावश्यक सेवांवर परिणाम होणार नाही, याची काळजी प्रशासन घेते असुन सकाळी 7 ते 10 या वेळेत भाजीपाला खरेदी व विक्री ची परवानगी देण्यात आलीय.याबाबदची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही ट्विट करत दिली आहे.

या पार्श्वभूमिवर जिल्ह्यातील प्रमुख अधिकार्‍यांसमवेत आज सकाळी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक झाली. कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या सर्व  उपाययोजना तातडीने कराव्यात, असे निर्देश मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत.