नारी शक्ती महान !प्रार्थना बेहेरेचा महिलाशक्तीवर नवा फोटोशूट

0
32

मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे नेहेमी तिच्या वेगळ्या अंदाजसाठी मराठी चित्रपट श्रुष्टीत नेहेमीच चर्चेत असते. ती आपल्या फॅन्स साठी नवनवीन स्टाईल आणि कल्पनाशक्तीचा वापर करून फोटोशूट करत शेअर करत असते.८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त तिने गरीब आणि कष्टकरी महिलांची स्थिती फोटो च्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला होता.आता या फोटोशूट अल्बम मधील काही फोटोज तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहेत.या फोटोशूटची भरभरून तारीफ होत असून या पोस्ट वर फॅन्स खूप प्रतिसाद देत आहेत.महिला कोणत्याही क्षेत्रातील असो त्या नेहेमी लढत असतात हे दाखवण्याचा उद्देश या अभिनेत्रीने केला आहे.त्यामुळे तिची सर्वत्र तारीफ होत आहे.
फोटोज शेअर करत ती म्हणाली ‘जागतिक महिलादिनी आम्हांला त्या कणखर आणि खंबीर महिलांना सलाम करावासा वाटतो ज्या आपल्या कष्टाने रोज घाम गाळून छोट्या प्रमाणावर का होईना देशाच्या आर्थिक उन्नतीतमध्ये भर घालतात आणि नेटाने आपले घर आणि देश चालवतात आशा सर्व कष्टकरी रणरागिनी महिलांना माझा सलाम ‘