निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर अन शरद पवार यांच्यात दिल्लीत बैठक

0
28

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक सुरु आहे. मुंबईतील भेटीनंतर आता दिल्लीत या दोघांमध्ये खलबतं सुरु असल्याची माहिती मिळत आहे. प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. आता दुसऱ्यांदा प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
यापूर्वीही निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत दोघांमध्ये जवळपास तीन तास वेगवेगळ्या विषयांवर गप्पा रंगल्या. पश्चिम बंगाल निवडणूक, देशातील राजकीय परिस्थिती याबाबत या भेटीत सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेसच्या विजयानंतर या भेटीला विशेष महत्व आले होते. भेटीनंतर त्यांनी एकत्र जेवण केलं अशीही माहिती आहे