परमबीर सिंग यांची SC आदेशानंतर उच्च न्यायालयात धाव 

0
25

परमबीर सिंग यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायायलात धाव घेतली होती. काल सर्वोच्च न्यायालयाने सुनवाणीदरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप असताना त्यांना पक्षकार का केलं नाही? अशी विचारणा केली होती. अशी विचारणा केली. परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.के. कौल आणि आर. सुभाष यांच्या खंठपीठासमोर सुनावणी झाली.तसेच दुसरीकडे मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन करण्यात आलेली बदली रद्द करावी, अशी देखील मागणी याचिकेत करण्यात आली. सिंग यांच्यावतीने अ‌ॅड. मुकुल रोहतगी यांनी युक्तिवाद केला. मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन करण्यात आलेली बदली हा दुर्मीळ प्रकार असल्याचं रोहतगी म्हणाले. त्यावर कोर्टाने हे प्रकरण एवढं गंभीर होतं तर तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाही?  असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने रोहतगी यांना हायकोर्टात जाण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालय याचिका दाखल केली आहे.