परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ, क्रिकेट बुकी सोनू जालानचा गंभीर आरोप

0
21

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचा आरोप करणारे पोलीस अधिकारी परमबीर यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर आता पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. क्रिकेट बुकी सोनू जालान याने परमबीर सिंग यांच्यावर हे आरोप केले आहेत. अनिल देशमुखांवर आरोप केल्यानंतर आता
2018 साली परमबीर सिंग यांनी मकोका लावून 3 कोटी 45 लाख रुपये वसूल केले असा आरोप खुद्द परमबीर यांच्यावर लागला आहे. याशिवाय, सोनू जालान याने पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आणि कोथमिरे यांच्यावरही आरोप केले आहेत.
यासंदर्भात सोनू जालान याने पोलीस महासंचालक संजय पांडे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलीस महासंचालकांनी हे प्रकरणा तात्काळ राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग केल्याची माहिती आहे.

Leave a Reply