परमबीर सिंग यांच्या प्रॉपर्टीचा हिशोब जनतेला कळूद्या, राष्ट्रवादीची मोठी मागणी 

0
28

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. आता राष्ट्रवादीकडून परमबीर सिंगांवर पलटवार करत यांच्या संपत्तीची चौकशी करा, अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी परमबीर सिंगांच्या मालमत्तेच्या चौकशीची मागणी केली आहे.
“माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली ही त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर केली. तरीदेखील परमबीर सिंग यांनी याचिका दाखल केली आहे. यामागे कुणाचा हात आहे हे सर्वज्ञात आहे. दिल्लीला गेल्यानंतर एवढा बदल कसा होतो” असा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला आहे. त्या अधिकाऱ्याची प्रॉपर्टी किती आहे याची चौकशी करावी, अशी मागणी शिंदे यांनी राज्य सरकारला केली आहे.