परमबीर सिंह यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

0
20

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटरबॉम्ब टाकत सचिन वाझे याच्यामार्फत पैसे वसुलीचा गंभीर आरोप केला होता. या लेटरबॉम्बनंतर राज्याचं पोलीस दल आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली. तसंच अनिल देशमुख यांनाही गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये  परमबीर सिंह  यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. परमबीर सिंह यांच्या 8 जणांविरोधात हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये 6 पोलीस आणि दोन इतरांचा समावेश आहे. भ्रष्टाचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याचं समजतंय.