परराष्ट्र मंत्रालयाचे आंतरवासिता धोरण जाहीर

0
31

परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील सर्व राज्यांकरिता आंतरवासिता धोरण जाहीर केले आहे. अलीकडेच ऑगस्ट २०१६ मध्ये मंत्रालयाच्या आंतरवासिता धोरणासंबंधी प्रकाशित नियमांचा व्यापक आढावा घेण्यात आला असून त्याचा मुख्य उद्देश म्हणजे एम ए ई वरती जास्त लक्ष केंद्रीत करणे, आंतरवासितांना जास्त वाव मिळवून देणे, तसेच मंत्रालयाने आंतरवासितेसाठी (internship) निवडलेल्या उमेदवारांत पात्रता आणि या उमेदवारांमध्ये विविधता वाढवणे, लैंगिक समावेशकता निर्धारित करणे, हा आहे.विविध मोहिमा व अभियानात आंतरवासिता करणारे तथा विदेशात कार्य करणाऱ्यांसाठी जाणाऱ्यांसाठी अस्तित्वात असलेल्या नीती धोरणांमध्ये हा आढावा घेताना कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत, असेही प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.