पार्थ पवार फाऊंडेशनने राबविलेले ‘मोफत बिनटाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर’

0
43

उरण: पार्थ पवार फाऊंडेशनने भेट स्वरूपात मागील दोन आठवडे राबविलेले ‘मोफत बिनटाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर’ यशस्वीपणे पार पडले. पार्थ दादांवर जनतेनं दाखवलेल्या प्रेमाची, आशीर्वादाची कृतज्ञतापूर्वक परतफेड म्हणून पार्थ पवार फाऊंडेशनने मोफत बिनटाका मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर राबवलं. उरण तालुक्यातील १०१ रुग्णांवर मुंबईत जे.जे. हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया केली गेली. यावेळी रुग्णांनी पार्थदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्या निरोगी दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. तसेच सामाजिक कार्याचा हा संस्थारूपी ‘वटवृक्ष’ असाच वाढत राहो, अशा सदिच्छा पार्थ पवार फाऊंडेशनला दिल्या. नेत्ररोगतज्ज्ञ ‘पद्मश्री’ डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख यांच्या मार्गदर्शनामुळे आणि डॉ. सुमित लहाने व डॉ. प्रियांका यांच्या सहकार्याने हा उपक्रम सुरळीत आणि निर्विघ्नपणे संपन्न झाला. रुग्णांनी डॉ. लहाने साहेबांसोबतच त्यांच्या सेवेत स्वतःला वाहून घेतलेल्या डॉक्टरांचे, परिचारिकांचे सुद्धा आभार मानले. पुढील आठवड्यात या रुग्णांची इंदिरा गांधी हॉस्पिटल, उरण येथे पुन्हा तपासणी करण्यात येईल.
यावेळी, एचडीएफसी बँकेनं सामाजिक उत्तरदायित्वातून उपलब्ध करून दिलेल्या फिरत्या रुग्णवाहिकेचं लोकार्पण डॉ. लहाने साहेबांच्या हस्ते पार पडलं.
पार्थ पवार यांच्या सामाजिक जाणीवेतून सुरु झालेल्या या उपक्रमामुळे थरथरत्या हातांना उतार वयात आधार मिळाला आहे.