पुणे पोलिसांच्या ‘माय पुणे सेफ’ ॲपसह बदली सॉफ्टवेअरचे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

0
32

पुणे :- उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘माय पुणे सेफ’ ॲप व बदली सॉफ्टवेअरचे उद्घाटन करण्यात आले.

माय पुणे सेफ ॲपची कार्यपद्धती

पुणे शहरातील नागरिकांसाठी तसेच कोणत्याही घडलेल्या घटनेच्या ठिकाणी पोलीसांची तात्काळ सेवा उपलब्ध होण्यासाठी पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे संकल्पनेतून पुणे शहर आयुक्तालयातील पोलीस स्टेशन कडील बिट मार्शल यांचे दैनिक गस्तीसाठी “माय सेफ पुणे” ॲप तयार करण्यात आले आहे. या  ॲपच्या सहाय्याने पोलीस स्टेशन कडील बिट मार्शल हे हद्दीमध्ये पेट्रोलिंग दरम्यान एखाद्या घडणाऱ्या गुन्ह्यास प्रतिबंध होण्याकरीता महत्‍त्वाचे ठिकाणी भेटी देऊन किंवा कोणत्याही घडलेल्या घटनेच्या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणी सेल्फी फोटो काढून माय सेफ पुणे ॲपमध्ये अपलोड केल्यास घटनेच्या ठिकाणाचे अक्षांश आणि रेखांश व वेळ नोंद होते. ॲपवरुन पोलीस नियंत्रण कक्ष पुणे शहर यांना सदरचे बिट मार्शल कोणत्या भागामध्ये गस्तीवर आहे याची माहिती मिळते. बिट मार्शलने कोणत्या वेळी कोणत्या ठिकाणी भेट दिली याची सर्व माहिती कायमस्वरुपी ॲप मध्ये उपलब्ध राहते. हे ॲप परिमंडळ चारचे पोलीस उप आयुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ कार्यक्षेत्रामध्ये यशस्वीरित्या राबविण्यात आले आहे.