पुणे बार्टीमार्फत ऑनलाईन एमपीएससी मुख्य परीक्षा मार्गदर्शन 

0
20

मुंबई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी माहे जुलै ते सप्टेंबर 2020 या दरम्यान यू ट्युब चॅनलवर  “Barti Online” द्वारे एम. पी. एस. सी. पूर्व  परीक्षेचे ऑनलाइन प्रशिक्षण सुरु करण्यात आलेले होते. 18 मार्च 2021 पासून एमपीएससी मुख्य (Mains) परिक्षेसाठी ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात आले आहे. इच्छूक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया बार्टी, पुणे च्या www.barti.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड तसेच ई- बार्टी ॲपमधील M-governance अंर्तगत ऑनलाईन “एमपीएससी मुख्य (Mains) परीक्षा ऑनलाईन कोचिंगसाठी प्रवेश अर्ज”  या लिंकवर उपलब्ध आहे.या प्रशिक्षणाचा कालावधी एकूण 4 महिन्यांचा (जुलै 2021 पर्यंत) असेल व आवश्यकतेप्रमाणे हा कालावधी कमी किंवा अधिक करण्यात येईल.