पुण्यात कोरोनाचा कहर कायम, २४ तासात आढळले १०८२ रुग्ण

0
25

पुण्यात गेल्या २४ तासात कोरोनाचे १०८२ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे.यामध्ये दिवसभरात ६७८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.मात्र वाढती कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यामध्येच पुण्यात करोनाबाधीत ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतीये यामधील ०१ रूग्ण पुण्याबाहेरील असल्याचे सांगितल्या गेले तसेच ३७० क्रिटिकल रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पुण्यात आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २१९२८५ वर येऊन ठेपली असून पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या आता ११९८४ झाली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ४९६२ झाली आहे.२०२३३९ रुग्णांना आजपर्यंत डिस्चार्ज मिळाला असून आज एकूण ७२६६ नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.