पेट्रोल महागले ; सलग दुसऱ्या दिवशी झाली दरवाढ 

0
8

महिनाभरापासून स्थिर असलेल्या पेट्रोलच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे

सोमवारी पेट्रोल १६ पैशांनी वाढले असून डिझेल दर मात्र स्थिर आहेत

त्याआधी रविवारी कंपन्यांनी पेट्रोलचा भाव १६ पैशांनी वाढवला होता

अनलॉकच्या दिशेनं वाटचाल करणाऱ्या अर्थव्यवस्थेची घडी आता पूर्वपदावर येत आहे

त्यामुळे इंधन मागणी देखील वाढत आहे

केंद्र आणि राज्य सरकारच्या स्थानिक कराच्या बोजाने पेट्रोल आणि डिझेलचे भाव भरमसाठ वाढले आहेत

यावर विविध माध्यमातून टीका झाली

त्यानंतर ३० जुलै रोजी दिल्ली सरकारने डिझेलमध्ये ८.३६ रुपये शुल्क कपात केली

त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर प्रती लीटर ७३.५६ रुपये प्रती लीटर झाला

मात्र हा बदल काही दिवसांपुरताच राहिला आणि पेट्रोल डीजेल च्या किमती परत वाढल्या आहेत

Leave a Reply