बदलापूरमधील ईस्टर इंडिया कंपनीमध्ये आग

0
44

बदलापुरात एका बंद केमिकल कंपनीला आग लागल्याची घटना आज पहाटे घडली. या आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे.बदलापूरच्या खरवई एमआयडीसीत असलेल्या ईस्टर इंडिया या कंपनीला ही आग लागली आहे. पहाटे 4 वाजताच्या सुमारास लागलेल्या या आगीने काही वेळातच रौद्ररुप धारण केलं. या आगीची माहिती मिळताच अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर आणि एमआयडीसी अग्निशमन दलाच्या एकूण 9 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अखेर दोन तासांच्या प्रयत्नानंतर सकाळी 6 वाजता ही आग नियंत्रणात आली.

आग लागलेली कंपनी मागील 3 महिन्यांपासून बंद असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे या आगीत कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नसून कंपनी मात्र संपूर्णपणे जळून खाक झालीये.