बप्पी लहरी यांना कोरोनाची लागण, ब्रीज कँडी रूग्णालयात दाखल 

0
23

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झाल्यावर त्यांना लगेच ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बप्पी दा कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती त्यांची मुलगी रीमा लहरी हिने दिली आहे.रीमाने एक स्टेटमेंट जारी केल आहे. ‘बप्पी दा यांनी खूप काळजी घेतली. याऊपरही त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळलीत. वयोपरत्वे त्यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. ते लवकरच स्वस्थ होऊन घरी परततील. त्यांच्यासाठी प्रार्थना करणा-यांचे, त्यांच्यावर प्रेम करणा-यांचे आभार,’ असे रिमाने तिच्या स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.गेल्या काही दिवसांत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झालीये. 27 नोव्हेंबर 1952मध्ये पश्चिम बंगालमध्ये बप्पी लहरी यांचा जन्म झाला.  1973मध्ये ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटातून करियरची सुरुवात केली