बीड जिल्ह्यात 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर 

0
26

बीड: राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच असल्याचे दिसून येत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मराठवाडा या ठिकाणी कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात बीड जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. 26 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. बीड जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन लागू केल्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. दहा दिवस लॉकडाऊन लागू करण्यात येईल. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता बीड जिल्हा कडकडीत बंद राहणार आहे.याआधी बीड जिल्ह्यामध्ये सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी घेतला होता. 13 मार्चपासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला होता.