बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार कोरोना पॉसिटीव्ह

0
22

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षयने ट्वीट करुन ही माहिती फॅन्सला दिली. सध्या अक्षय कुमार होम क्वारंटाइन झाला आहे. वैद्यकीय सल्ल्याने तो उपचार घेत असून अक्षयने मागील एक-दोन आठवड्यात त्याच्या संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचा आणि बरे वाटत नसल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. मनात शंका असेल तर स्वतःची कोरोना चाचणी करुन घ्या. मास्क घाला, सोशल डिस्टंस पाळा आणि सर्व कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करा; असे आवाहन बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने नागरिकांना केले.