बॉलिवूडच्या ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’चा सोशल मीडियाला राम राम!

0
33

बॉलिवूडचा अभिनेता आमिर खानने अचानक सोशल मीडिया सोडण्याची घोषणा केली आहे. त्याने आपल्या शेवटच्या इंस्टा पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल आभारी आहे. माझे मन तुमच्या प्रेमाने भरले आहे.’ अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अभिनेत्याचे चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत.अभिनेता सध्या त्याच्या आगामी ‘लालसिंग चड्ढा’ चित्रपटाच्या चित्रीकरणात आहे.तसेच आगामी चित्रपट ‘लालसिंग चड्ढा’ रिलीज होईपर्यंत आपला फोन ‘लॉक’ ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सेटवर त्याचा मोबाईल सतत वाजल्यामुळे त्याच्या कामावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी त्याने फोन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


ते पोस्ट मध्ये म्हणाले ‘मित्रांनो, माझ्या वाढदिवसाच्या माझ्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद! माझे हृदय भरून आले आहे. दुसरी बातमी अशी आहे की सोशल मीडियावरील ही माझी शेवटची पोस्ट असेल. तरीही मी या माध्यमावर फारसे सक्रिय नसलो, तरी मी त्यांच्यापासून दूर राहण्याचे निश्चित केले आहे. आपण पूर्वीप्रमाणेच बोलू.यानंतर एकेपीला (आमिर खान प्रॉडक्शन) त्याचे अधिकृत चॅनेल बनवले आहे, तर भविष्यात तुम्हाला त्याच्या चित्रपटांच्या अपडेट्स त्याच्या हँडल @akppl_official वर मिळेल. भरपूर प्रेम.’