भांडूपमधील कोरोना रुग्णालयात मृत्युमुखी पडलेल्यांना सरकारतर्फे ५ लाखांची मदत जाहीर

0
22

मुंबई: भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये लागलेल्या आगीमुळे सनराईज रुग्णालयातील रुग्णांच्या झालेल्या मृत्यूंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणीही केली. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.तसेच राज्यभरात ज्या मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये कोविड  रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये सुरू आहेत तेथील अग्नीसुरक्षेची तपासणी तात्काळ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यासंदर्भात ज्यांनी दुर्लक्ष व दिरंगाई केली अशा सर्व जबाबदार लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल.ज्या रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांप्रति मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.अशा दुर्घटना घडू नये, म्हणून याआधीच सूचना देण्यात आलेल्या आहेत.