भाजप आमदाराचा आरोप, ब्लॅक लिस्ट कंपनीलाच पुन्हा पालिकेकडून कंत्राट

0
21

मुंबई महापालिकेनं ब्लॅक लिस्ट केलेल्या कंपनीलाच शहरात नवं कंत्राट दिल्याचा आरोप भाजप आमदाराने केला आहे. ब्लॅक लिस्ट केलेल्या कंपनीलाच 16 नवे ऑक्सिजन लावण्याचं कंत्राट दिल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला आहे. हे कंत्राट 84 कोटी रुपयांचे असून ‘ हायवे कंस्ट्रक्शन कंपनी’ला देण्यात आले आहे.

अमित साटम यांनी पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना लिहिलेल्या पत्रात कंत्राट देण्याच्या प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, काम पूर्ण झालेली नसतानाच या कंत्राटदाराला आणखी सव्वा तीनशे कोटींचं  कंत्राटही ‘हायवे कंस्ट्रक्शन कंपनी’ देण्यात आल्याचा आरोप साटम यांनी केला आहे