भाजप नेत्याच्या भावावर हल्ला, हल्ल्यात गाडीचं मोठं नुकसान

0
25

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 च्या पहिल्या टप्प्यात आज राज्यातील एकूण ३० मतदारसंघांसाठी मतदान सुरू आहे. याच दरम्यान कांथी भागात भाजप नेते सुवेन्दू अधिकारी यांचा भाऊ सौमेंदू अधिकारी यांच्यावर हल्ला झाल्याचं समजतंय.या हल्ल्यात सौमेंदू अधिकारी यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालंय. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप अधिकारी यांनी केलाय.टीएमसी ब्लॉक अध्यक्ष राम गोविंद दास आणि त्यांची पत्नी यांच्या देखरेखीखाली तीन मतदान केंद्रांवर गोंधळ सुरू होता. जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा त्यांना मनमानी करता येईना, त्यामुळे त्यांनी माझ्या गाडीवर हल्ला केला आणि माझ्या गाडीच्या चालकाला मारहाण केली’ असा दावा सौमेंदू अधिकारी यांनी केलाय. या हल्ल्यात अधिकारी यांच्या गाडीच्या चालकाला दुखापत झालीय. अधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलीय.