भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा रंगणार क्रिकेट सामने! -२० मालिका सुरू होण्याची शक्यता

0
25

जागतिक क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढती या हायव्होल्टेज होतात. गेल्या काही वर्षात या दोन्ही देशातील क्रिकेट सामने झाले नाहीत. राजकीय संबंधांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका झाल्या नाहीत. हे दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धेत एकमेकांविरुद्ध लढतात. पण आता दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जवळ जवळ १० वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने झाले नाहीत. आता पुन्हा एकदा दोन्ही देशातील क्रिकेट सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अनुकुल वातावरण तयार होत आहे. पाकिस्तानमधील एका वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार या दोन्ही देशात पुन्हा एकदा क्रिकेट सुरू होऊ शकते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डा ने देशातील सरकारच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा केली आहे. नियोजित योजनेनुसार जर सर्व काही ठीक झाले तर या वर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका होऊ शकते.