भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले ‘हे’ तीन ठिकाणी, रिश्टर स्केलवर 5.3 तीव्रता

0
20

भूकंपनाच्या तीव्र धक्क्याने राजस्थानमधील बिकानेर हादरले. येथे भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.3 नोंदविली गेली आहे. नॅशनल तेंटर फॉर सिस्मोलॉजीने सांगितले की, हे भूकंप पहाटे 5:24 वाजता बीकानेरमध्ये झाला. भूकंपामुळे आतापर्यंत कोणतेही नुकसान झालेले नाही.


राजस्थान आधी मेघालयमध्ये रात्री 2.10 वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के बसले. ज्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.1 नोंदविण्यात आली. अहवालानुसार, भूकंपाचे केंद्रबिंदू पश्चिम गॅरो हिल्स येथे होते. परंतु अद्यापपर्यंत मेघालयातही कोणाचेही नुकसान झाले नसल्याचे वृत्त आहे. त्याशिवाय लेह-लडाख भागातही पहाटे 4.57 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले, ज्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.6 होती.