‘मला बळीचा बकरा बनवलं’, सचिन वाझेंचा विशेष एनआयए कोर्टात दावा

0
29

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्याबाहेर स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं ठेवल्याप्रकरणी आरोपी सचिन वाझे यांच्या विरोधात विशेष एनआयए न्यायालयात सुनावणी होत आहे. यावेळी ‘मला बळीचा बकरा बनवंल जातंय’, असा दावा सचिन वाझे यांच्याकडून एनआयए न्यायालयात करण्यात आला. मी केवळ या प्रकरणाचा तपास करत होतो. तर बचावपक्षाचा हा युक्तिवाद हास्यास्पद असल्याचं एनआयएच्या वतीनं न्यायालयात सांगण्यात आले आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरणी सचिन वाझे यांच्याविरोधात आता गैरकायद कृत्य प्रतिबंधित अधिनियम (UAPA) अंतर्गत कलम 16 आणि 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच संदर्भात आज न्यायालयात सुनावणी करण्यात आली.’मला बळीचा बकरा बनवंल जातंय’, असा दावा सचिन वाझे यांच्याकडून एनआयए न्यायालयात करण्यात आला. मी केवळ या प्रकरणाचा तपास करत होतो. मी दीड दिवस या प्रकरणाचा तपास अधिकारी होतो.