महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती मागील पाच वर्षापेक्षा अधिक चांगली; गुन्हे दर कमीच – गृहमंत्री अनिल देशमुख

0
37

मुंबई : मागील पाच वर्षापेक्षा गेल्या वर्षभरात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती चांगली असून शिक्षा होण्याच्या प्रमाणात व दरातही मोठी वाढ झाली आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.विधिमंडळात श्री.देशमुख यांनी ही माहिती दिली.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड  ब्युरोच्या अहवालानुसार राज्याचा गुन्हे सिद्ध होण्याचा दर १३%ने वाढला आहे. आता  हा दर ६२% आहे. शिक्षा होण्याचा एवढा दर या आधी कधीच नव्हता. तसेच पोक्सो अंतर्गत गुन्ह्यातही घट झाली असून ही घट ३२०० ने आहे. महत्त्वाचे म्हणजे महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यातही  ९५९ ने घट झालेली आहे. त्याचबरोबर दंगे, चोरी, फसवणूक,अपहरण या गुन्ह्यातही राज्यात घट झालेली आहे.देशाच्या तुलनेत बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये राज्याचा क्रमांक २२ आहे. खुनाच्या गुन्ह्यात २५ वा तर महिलांवरील गुन्ह्यांमध्ये १३ वा आहे.

सन २०१९ मध्ये दाखल गुन्ह्यांची व सन २०२० मध्ये दाखल गुन्ह्यांची तुलना केली असता लक्षात येते. एकूणच राज्यातील कायदा व सुव्यवस्था मागील काळापेक्षा चांगली आहे, असे श्री.देशमुख यांनी सांगितले.