महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त करा, संजय राऊत विरोधकांवर कडाडले 

0
24

मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं अन मनसुख हिरन हत्याप्रकरणात सचिन वाझेंना झालेली अटक त्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप या सर्व घटनांमुळं राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे. भाजप व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना फटकारलं आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याऐवजी केंद्र सरकारच बरखास्त केलं पाहिजे, असं राऊतांनी म्हटलं आहे.
तसेच ते म्हणाले ‘प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. बाबासाहेब घटनाकार आहेत. त्यांच्याविषयी आमच्या मनात किती श्रद्धा आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावावी असं प्रकाश आंबेडकर सांगत असतील, तर त्यांनी पुन्हा एकदा घटनेचा अभ्यास करणं गरजेचं आहे.’