महाराष्ट्रात मिनी लॉकडाऊन जाहीर ,काय सुरू काय बंद ?

0
23

राज्यात कोरोनाचा प्रकोप झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन केला जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र 30 एप्रिलपर्यंत काही कडक निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे. आज  राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरु असून या बैठकीनंतर सविस्तर माहिती समोर येणार आहे. लॉकडाऊन नसला तरी नियम मात्र कडक केले जाणार आहेत. हे नियम काय असतील त्याबाबत गाईडलाईन्स आजच घोषित होण्याची शक्यता आहे. मात्र लॉकडाऊन होणार नाही हे मात्र निश्चित झाले आहे. आज लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी  राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे.  2 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या संवादात येत्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार असल्याचं म्हटलं होतं.

  • उद्यापासून रात्री 8 ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी, गर्दी केल्यास कलम 144 नुसार कारवाई होणार
  • मॉल, बार, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय, ‘टेक अवे’ सर्व्हिस सुरु राहणार सर्व उद्योग चालू राहणार, उद्योग क्षेत्रातील कामगारांवर कुठलेही निर्बंध असणार नाहीत.
  • सर्व बांधकामे सुरु राहतील
  • सरकारी ठेके असलेली कामेही सुरु राहणार
  • भाजी मार्केटवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध असणार नाहीत, फक्त गर्दी कमी करण्यासाठी कठोर नियम असतील
  • शुटिंगवर गर्दी होणार नाही अशी ठिकाणी परवानगी दिली जाणार. मात्र राज्यातील चित्रपटगृहे बंद राहणार
  • सर्व वाहतूक व्यवस्था सुरु राहणार. मात्र प्रवास करताना मास्क बंधनकारक
  • 50 टक्के क्षमतेने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार