महाराष्ट्राला कोरोना लसीचे २.२० कोटी डोस मिळावे, महाराष्ट्राची केंद्र सरकारकडे मागणी- राजेश टोपे

0
33

राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे या पार्श्वभूमीवर लसीकरणाला गती देण्यासाठी प्राधान्यक्रमाच्या गटातील सुमारे 1.77 कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून 2.20 कोटी डोस उपलब्ध करून देण्याची मागणी आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.