महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लसी खरेदी करू द्या,राज ठाकरे यांचं पंतप्रधानांना पत्र

0
28

महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचं असेल तर 100 टक्के लसीकरणाची गरज असल्याचं मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. राज ठाकरे यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्री मोदी यांना पत्र लिहून केंद्राची मदत मागितली आहे. राज्यातील सर्व वयोगटातील 100 टक्के लोकांचं लसीकरण लवकरात लवकर करायला हवं. रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा असावा म्हणून राज्याला आवश्यक पावलं उचलण्यासाठी मोकळीक द्यावी,” असं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

“राज्याला स्वतंत्रपणे लसी खरेदी करु द्याव्या. हाफकिन आणि हिंदुस्तान अँटिबायोटिकला लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा असावा म्हणून राज्याला आवश्यक पावले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली आहे