महावितरणचा कारभार, ट्रान्सफॉर्मर गाडीत पडल्याने २७ तासांपासून लोक अंधारात

0
32

सध्या राज्यात विजेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी वीज बील न भरल्याने वीज जोडणी कनेक्शन तोडले आहेत. तर दुसरीकडे शहरात लोकांना अव्वाची सव्वा लाईट बील आले आहेत. मात्र, वीज लोकांना वेळेवर मिळते का? टिटवाळ्यामध्ये तर 27 तास झाले तरी खंडीत वीज पुरवठा पुर्ववत झालेला नाही.

टिटवाळा येथील आर के नगरमधील वीज पुरवठा खंडीत झाला आहे. या संदर्भात महावितरणचे अधिकारी अगोदर ट्रान्सफॉर्मर खराब झाला असल्याचं सांगत होते. मात्र, नंतर महावितरणला वीज का आली नाही? असा प्रश्न विचारला असता, आता त्यांनी आणलेल्या ट्रान्सफॉर्मर उतरायला क्रेन नसल्याचं कारण महावितरण ने दिलं आहे. लोकांची बील थकल्यानंतर तात्काळ कनेक्शन कापणाऱ्या महावितरण लोकांना सुविधा देताना ही तत्परता का दाखवत नाही. असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.