महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्यात गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञानाचा वापर – ॲड. यशोमती ठाकूर

0
28

मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्यात गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञानाचा वापर होत आहे, असे मत व्यक्त करत ‘माविम ई- बिझनेस प्लॅटफॉर्म’साठी मिळालेल्या स्कॉच पुरस्काराबद्दल महिला व बालविकासमंत्री  ॲड. यशोमती ठाकूर यांनी ‘माविम’चे अभिनंदन केले.
राजमाता जिजाऊ माता बाल पोषण अभियानद्वारे ‘माविम’साठी निर्मित ‘माविम ई-बिझनेस प्लॅटफॉर्म’ ला नुकताच जानेवारीमध्ये ‘स्कॉच अवॉर्ड- सिल्व्हर’ हा देशपातळीवरील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार घोषित झाला होता. या पुरस्काराचे प्रमाणपत्र राजमाता जिजाऊ माता बाल पोषण अभियानाचे संचालक संजीव जाधव यांनी महिला व बालविकासमंत्री  ॲड. यशोमती ठाकूर यांना अवलोकनार्थ सादर केले. त्याचबरोबर ‘नागरी एकात्मिक बालविकास सेवा योजनेची पुनर्रचना’ याबाबतचा अहवालही ॲड.ठाकूर यांना सादर करण्यात आला.‘स्कॉच’पुरस्कार स्वतंत्र आणि त्रयस्थ संस्थेमार्फत देण्यात येणारे देशपातळीवरील मानाचे पुरस्कार म्हणून गणले जातात. यावर्षी तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये उत्कृष्टता (एक्सेलन्स इन टेक्नॉलॉजी) या गटात ‘माविम ई-बिझनेस प्लॅटफॉर्म’ला देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.हा पुरस्कार नुकताच प्राप्त झाल्यानंतर मंत्री ॲड. ठाकूर यांना अवलोकनार्थ सादर करण्यात आला.