महिला दिनाची सुरवात कोठून? २८ फेब्रुवारीचा महिला दिन ८ मार्च वर कसा आला.. 

0
29

आज 8 मार्च जागतिक महिला. दिवसाच्या सुरवातीपासून तर रात्रीच्या झोपेपर्यत महिला विना फायदा आपल्या सर्वांसाठी राबत असतात.आपल्या घरापासून ते देशाच्या विकासामध्येही महिलांचे मोठे योगदान आहे. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महिलांप्रति आदर व्यक्त करतो. मात्र महिला दिन नेमका सुरू कोठून झालाय हे बघुयात
सर्वात पहिला जागतिक महिला दिन साजरा करण्याची सुरवात 28 फेब्रुवारी 1909 रोजी करण्यात आला. महिला दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र संघात एक थीम तयार करण्यात आली होती. जागतिक महिला दिनाची पहिली थीम सेलिब्रेटिंग द पास्ट, प्लानिंग फॉर द फ्युचर ठेवली होती. विशेष म्हणजे प्रत्येकवर्षी जागतिक महिला दिवस साजरा करताना एक विशेष थीम बनवण्यात येते. यावर्षी “Women in leadership: an equal future in a COVID-19 world” कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थीम तयार करण्यात आली आहे.
1908 मध्ये 15 हजार महिलांनी न्यूयॉर्कमध्ये रस्त्यावर उतरत एक मोर्चा काढला होता. मतदानाचा अधिकार, कमी तासाची नोकरी आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळावी या तीन प्रमुख गोष्टींच्या मागण्यांसह हा मोर्चा काढण्यात आला होता.यानंतर 1909 मध्ये अमेरिकेत सोशलिस्ट पार्टीने एक घोषणा केली आणि युनायटेड स्टेटमध्ये पहिला जागतिक महिला दिन 28 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला होता. यानंतर सन 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. तसेच 19 मार्चला पहिल्यांदा ऑस्ट्रिया डेन्मार्क आणि स्वित्झरलँडमध्येही जागतिक महिला दिवस साजर केला.

दोन वर्षानंतर 1913 मध्ये जागतिक महिला दिनाची तारीख बदलून 8 मार्च करण्यात आली आणि तेव्हापासून आजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात मुंबई येथे पहिला महिला दिन हा 8 मार्च 1943 ला साजरा झाला.

Photo: sudarsan pattnaik