माजी आमदार आसिफ शेख रशीद यांचा समर्थकांसहीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

0
31

मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख रशीद यांनी त्यांच्या समर्थकांसहीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. 
या पक्षप्रवेश कार्यक्रमाला माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, मुंबई विभागीय विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष अमोल मातेले उपस्थित होते.