माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची सर्वोच्च न्यायालयात धाव 

0
26

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेल लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केले होते. उद्धव ठाकरे यांना जे पत्र लिहिलं होतं, त्या पत्रातील आरोपांची चौकशी करण्याची मागणी परमबीर सिंग यांनी केली आहे. एवढंच नाही या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज चौकशीची देखील मागणी केली आहे.
मुंबईतील प्रत्येक बारकडून ३ लाख रूपये वसुली करून १०० कोटी रूपये जमवून देण्याची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती, असा आरोप त्यांनी उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या ईमेलमध्ये केला होता.या आरोपांवर राज्य सरकारने लक्ष दिलं नसल्याने आता परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.