मास्क न घालण्याच्या वादातून महिलेने बीएमसी महिला कर्मचार्‍याला केली मारहाण, गुन्हा दाखल

0
28

मुंबईत मास्क न घातल्यामुळे एका महिलेला बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) महिला कर्मचार्‍याने रोखले असता त्या महिलेने बीएमसी कर्मचारी महिलेला मारहाण केली. या घटनेचा कुणीतरी व्हिडिओ बनविला आहे, ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्याबद्दल 200 रुपये दंड आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. पोलिसांनी यामध्ये चौकशी करत सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.ही घटना कांदिवली लिंक रोड वरील असल्याची माहिती मिळत असून चारकोप पोलीस याबाबद अधिक चौकशी करत आहे.