मिताली अन सिद्धार्थची लग्नानंतर पहिली धुळवड; शेअर केले फोटोज

0
26

मराठी अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ काही दिवसांपूर्वीच लग्नाच्या बंधनात अडकले आहेत.त्यांचे लग्न लॉकडाऊन च्या काळात झाल्याने त्यांना इतर सण हे घरात राहूनच साध्या पद्धतीने साजरे करावे लागले. दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा होणारा सण म्हणजे होळी आणि रंगपंचमी मात्र यावर्षी कोरोनाचे सावट निर्माण झाले आहे त्यामुळे अनेक अभिनेते हा सण घरातच साजरा करत आहेत.नुकतेच मिताली आणि सिद्धार्थने काही फोटोज शेअर केले आहेत.ज्यामध्ये ते साध्या पद्धतीने रंग खेळतांना दिसून आले हे फोटो शेअर करत ते म्हणाले ‘लग्नानंतर ची पहिली धुळवड. घरात बसून खेळलेली पहिली धुळवड. हे ही बदलेल. पण त्यासाठी आज, उद्या, आणखी काही दिवस घरातच थांबावं लागेल. तेव्हढं करूया.☺️’तसेच फोटोचे क्रेडिट देत ती म्हणाली ‘When I say, ‘सिद्ध्या माझं डोकं खातो’ I mean it. Swipe for the proof.🤪😂’