मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान अडकला कोरोनाच्या विळख्यात

0
28

देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यात कोरोनाच्या विळख्यात बॉलिवूड आणि मराठी सिनेइंडस्ट्रीतील बरेच कलाकार अडकले आहेत. आता बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याने घरीच स्वतःला क्वारंटाइन केले आहे.आमिर खानने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाला अलविदा केला आहे. आमिरने त्याची शेवटची पोस्ट शेअर करत ही बातमी त्याच्या चाहत्यांना सांगितली होती. त्यामुळे त्याने सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली नाही. त्याने त्याच्या स्टाफलादेखील कोरोनाची टेस्ट करायला सांगितली आहे. आमिर खानने त्याच्या स्टाफला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय सर्व नियम आणि काळजी घेण्यासही सांगितले आहे.