मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे राज्यपालांच्या भेटीला 

0
25

मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा अशी आग्रही मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. यासाठी भाजपचे शिष्टमंडळ 24 मार्चला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीला जाणार आहे. त्या आधीच मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी राज्यपालांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले आहे.आजच परमबीर सिंगांनी होमगार्डच्या मुख्यालयात हजेरी लावली आणि महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला. यानंतर काही वेळातच राज्यपाल भवनाने ट्विट करून मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सदिच्छा भेट घेतल्याचे ट्विट केले आहे.