मुंबईतील ट्रेनमध्ये आढळले आठ कोरोना रुग्ण

0
26

मुंबईहून आलेल्या उद्योगनगरी एक्स्प्रेसमधून बेल्हा येथे दाखल झालेल्या रेल्वे मधून आठ प्रवासी कोरोना पोसिटीव्ह आढळले आहेत. त्यातील तीन जण चेकअपनंतर फरार झाले आहेत. गुरुवारी दुपारी एका प्रवाशाचा शोध लागला असून आरोग्य विभागाकडून इतर दोघांचा शोध घेत आहे.गुरुवारी सकाळी दिल्लीहून दाखल झालेल्या पद्मावत एक्स्प्रेसमधील 100 हून अधिक प्रवासी स्थानकावर उतरले यात दिल्ली आणि उत्तर प्रदेश बाहेरून आलेल्या 92 प्रवाश्यांची तपासणी करण्यात आली. परंतु कोरोनाचा संसर्ग झालेला आढळून आला नाही. दुपारी देहरादूनहून वाराणसीला जाणार्‍या जनता एक्स्प्रेसच्या बारा आणि जम्मूतवी-राजेंद्र नगर एक्स्प्रेसच्या 30 प्रवाशांची दुपारी तपासणी करण्यात आली. यामध्ये सुद्धा कोरोना संसर्ग झालेला व्यक्ती आढळला नाही.