मुंबईतील ‘या’ ठिकाणी 23 मार्चला 12 तास पाणीपुरवठा बंद

0
24

मुंबईच्या काही भागांमध्ये 23 मार्च दिवशी पाणीपुरवठा बंद असेल तर काही ठिकाणी कमी दाबाने पुरवला जाणार असल्याची माहिती बृह्न्मुंबई महानगरपालिकेने अर्थात बीएमसीने दिली आहे. बीएमसी कडून 12 तासांसाठी हा पाणीपुरवठा प्रभावित असेल असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी आजच उद्यासाठी देखील पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
मुंबई मध्ये पालिकेच्या एस वॉर्ड अर्थात भांडूप भागामध्ये 12 तास पाणी पुरवठा खंडीत असेल तर के-ईस्ट, एच ईस्ट, जी नॉर्थ म्हणजेच दादर पश्चिम, माहीम, धारावी, वांद्रे ईस्ट, अंधेरी ईस्ट या भागामध्ये देखील पाणीपुरवठा पालिकेकडून कमी दाबाने केला जाणार आहे. 23 मार्चच्या सकाळी 10 ते रात्री 10 असा 12 तास हा पाणीपुरवठा खंडीत राहणार आहे.