मुंबईतील 6 रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता! 168 कोरोना रुग्ण सुरक्षित ठिकाणी हलवले 

0
20

कोविड बाधित रुग्णांची संख्या संपूर्ण देशात वाढली आहे. त्यामुळे रुग्णांना प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवठा करण्याची गरज मोठ्या प्रमाणावर निर्माण झालीय. बृहमुंबई महानगरपालिका 6 रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता पडल्याने 168 रुग्णांना प्राणवायू उपलब्ध असलेल्या इतर कोविड रुग्णालय किंवा कोविड केंद्रांमध्ये सुरक्षितरित्या स्थलांतरीत करण्यात आलेय. प्राणवायू पुरवठा सुरळीत राहण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडूनही प्रयत्न सुरु आहेत
दरम्यान, मुंबई महानगरपालिका हद्दीतील सर्व 24 प्रशासकीय विभागात प्राणवायू पुरवठा सुरळीत राखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी अन्न व औषध प्रशासन तसेच प्राणवायू उत्पादक आणि संबंधित सहायक आयुक्त यांच्यासमवेत समन्वय साधण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने 6 समन्वय अधिकारी नुकतेच नियुक्त करण्यात आले. हे समन्वय अधिकारी 24×7 या स्वरुपात कार्यरत राहणार आहेत. यामुळे प्राणवायू पुरवठ्याबाबतची अडचण लागलीच निकाली निघण्यास मोलाची मदत होत आहे.