मुंबईत कोरोनाचा कहर ,२४ तासात सहा हजार पार रुग्णांना कोरोनाची लागण

0
27

मुंबई: कोरोनाने पुन्हा एकदा मुंबई शहरात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. राज्यात मुंबई आणि पुण्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधितांचा आकडा वाढता दिसून येत आहे. आरोग्य यंत्रणेकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाची साखळी मोडण्यासाठी आता रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच मुंबईतील कोरोना लसीकरण मोहिमेला वेग वाढविण्यात आली आहे.
मुंबईत गेल्या एका दिवसात आणखी 6,123 जणांना करोनाची लागण झाली .त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांची एकूण संख्या 3,91,751  वर पोहोचली आहे.