मुंबईत जयंत पाटील यांच्या हस्ते कोरोना लसीकरण नोंदणी कक्षाचे उद्घाटन

0
25

मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस कुलाबा तालुकाध्यक्ष मनोज अमरे यांच्या पुढाकाराने कोरोना लसीकरण नोंदणी कक्ष उभारण्यात येणार आहे. हे कक्ष कुलाबा तालुक्यातील पक्षाच्या प्रत्येक वॉर्डमध्ये उभारण्यात येतील. राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालय येथे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्या हस्ते या नोंदणी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. कोरोना लसीकरणाची जनजागृती करण्यासाठी तसेच विभागातील नागरिकांच्या सोयीसाठी हा उपक्रम फार उपयुक्त ठरेल. 

यावेळी प्रदेश चिटणीस संजय बोरगे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, मुंबई विभागीय युवती अध्यक्ष अदिती नलावडे, कुलाबा तालुकाध्यक्ष मनोज अमरे, कुलाबा तालुका सरचिटणीस दिपक पवार, अरुण बडदे, सचिव सचिन काशीद, चित्रपट सेल दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष गणेश वाडेकर, विद्यार्थी कुलाबा तालुकाध्यक्ष प्रतिक वाघमारे, तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.