मोठी बातमी: हेमंत नगराळे मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

0
50

मुंबई: सचिन वाझे प्रकरण मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंगयांना चांगलेच भोवले आहे .मुंबई पोलीस आयुक्त बदलाचे वारे वाहू लागले होते. त्यामुळे नवीन मुंबई पोलीस आयुक्त कोण? हा प्रश्न समोर आला होता. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोणाला पसंती देते याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.आता सरकारने यावर निर्णय घेतला आहे.श्री हेमंत नगराळे मुंबई पोलीस आयुक्त असणार आहे आणि श्री रजनीश शेठ यांच्या कडे पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे तसेच  श्री संजय पांडे यांच्या कडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी देण्यात आली. यामध्ये श्री परमवीर सिंह यांच्या कडे गृह रक्षक दलाची जवाबदारी सोपवली आहे.

राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर आले होते. बैठकीला पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि गृहमंत्री अनिल देशमुख, अनिल परबही उपस्थित होते. या बैठकीमध्ये सचिन वाझे प्रकरणावर दीर्घकाळ चर्चा पार पडली. मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास ही बैठक सुरु झाली ती सुमारे चार तास सुरु होती. मध्यरात्रीनंतर मंत्री आणि पोलीस अधिकारी वर्षा बंगल्यावरून परतले होते. तर आज गृहमंत्राच्या बंगल्यावर आज याप्रकरणी बैठक पार पडली असून मुंबई पोलीस दलात हा मोठा बदल करण्यात आला आहे.