मुंबईसह राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत तापमानात वाढ होऊन येणार उष्णतेची लाट 

0
25

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून तापमानात बदल झाल्याचं पहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांत तापमानात घट झाल्याचं पहायला मिळत असून वादळी वाऱ्यासह गारपीट सुद्धा झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच आता राज्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. “एनसीयूएम NCMRWF हवामान मॉडेल मार्गदर्शनानुसार, कोकण भागावर ईशान्य व उत्तरेकडून गरम व कोरड्या वारा यामुळे मुंबईसह पुढील तीन दिवसांत कोकणातील तापमानात वाढ होऊ शकते.”
पुढील दोन दिवसात महाराष्ट्रातील कोकणात (मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग) उष्णतेची लाट येऊ शकते आणि परिणामी कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे.