मुंबई अन नवी मुंबईत आगीचे तांडव ,अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

0
29

मुंबई अन नवी मुंबईत आगीच्या घटना समोर आल्या आहेत. नवी मुंबईत एका कंपनीत आग लागली असून गोरेगाव पूर्वेत एका भंगार गोदामाला भीषण आग लागली. गोरेगावात आग लागल्यानंतर गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. ही आग आज (16 मार्च) संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. आगीत कुणीही जखमी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत .तसेच नवी मुंबईमध्ये फरसाणच्या गोडाऊनला भीषण आग लागली आहे सदर घटनास्थळी ऐरोली अग्निशमन दलाचे २-फायर वाहन व कोपरखैरानी अग्निशमन दलाचा १-वॉटर टँकर तसेच एम.आय.डी.सी. अग्निशमन दलाचे २-फायर वाहन उपस्थित असून अग्निशमन दलाच्या जवानांनकडून आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.