मुंबई पोलिस आयुक्तपदावरील बेकायदेशीर बदली रद्द करण्याची परमबीर सिंग यांची मागणी 

0
29

सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन कमी झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडवली आहे. त्यानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक होत गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. दरम्यान सिंग यांनी पदावर असताना पत्र का लिहिलं नाही? असा सवाल सत्ताधाऱ्यांकडून विचारला जात आहे. त्यावर परमबीर सिंग यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात  धाव घेतली आहे.
परमबीर सिंग यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि आर. सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडेल. ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतही परमबीर सिंग यांची बाजू मांडणार आहेत.